प्रोफेसर चौकात दत्त देवस्थान देवगावच्या दिंडीचे स्वागत

दिंडीच्या आगमनाने शहराचे वातावरण विठ्ठलमय -बाळासाहेब गायकवाड

अहमदनगर (प्रतिनिधी)- दत्त देवस्थान देवगाव (ता. संगमनेर) येथील दिंडीचे सावेडी येथील प्रोफेसर चौकात भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी महिलांनी परिसरात सडा, रांगोळी टाकली होती तर दिंडीचे आगमन होताचा जय हरी विठ्ठल.. श्री हरी विठ्ठलचा गजर करण्यात आला.
दिंडीतील पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पालखीची आरती माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड व कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी टेपाळे गुरु, आनंद गोले, रमेश गायकवाड, नंदकुमार डापसे, गुरु कुलकर्णी आदी उपस्थित होते.
बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, विविध ठिकाणाहून आलेल्या दिंडीच्या आगमनाने शहराचे वातावरण विठ्ठलमय झाले आहे. हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती दिंडीतून पहायला मिळत असते. विठ्ठलाप्रती मनोभावे उपासना करणारे वारकरींची सेवा म्हणजे साक्षात विठ्ठलाचीच सेवा असल्याचे त्यांनी सांगितले.