बालाजी ग्रुप तर्फे अंध,अपंग, निराधार वंचित घटकातील नागरिकांना ब्लँकेटचे वाटप.

शहरातील तापमानाचा पारा हलवत असताना अंध,अपंग, निराधार व वंचित घटकातील नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. नाताळ सणानिमित्त व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. शहरांमध्ये अंध,अपंग,निराधार व वंचित घटकातील अनेक ज्येष्ठ नागरिक उघड्यावर झोपून आपले जीवन जगत आहेत वाढती कडाक्याची थंडी पाहता अंगात हुडहुडी भरत आहे उघड्यावर झोपणारयांचे जीवन चांगले होण्यासाठी बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक लॉरेन्स स्वामी यांच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते भरत पवार, मतीन सय्यद, रेगन स्वामी, रॉनी स्वामी, रोहन स्वामी, सय्यद शफी बाबा, निलेश बांगरे, नईम शेख, वसीम शेख, वामन मामा, श्याम घुले, मोसिन शेख, सचिन रोकडे, सचिन गवळी, सागर कांबळे, सोनू जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक लॉरेन्स स्वामी म्हणाले की नाताळ सणानिमित्त व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्राला लाभला हा महाराष्ट्रातील जनतेचा अभिमान आहे. समाजकारण हा आरपीआय पक्षाचा पाया आहे त्यांनी राजकारणात राहून समाजकारण करायला शिकवले सर्वसामान्य नागरिक व जनतेच्या केंद्रबिंदू मानून त्यांनी रोवली. तसेच वंचित व दुर्बल घटकांना मदत करण्याची भावना आरपीआय च्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.