बेलवंडी पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

अहमदनगर —श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी शिवारात बेलवंडी पोलिसांनी नाईट पेट्रोलिंग करत भिमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून दौंड कष्टी श्रोगोंदा  ते राजापूर शिरूर रोडने वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकवर कारवाई करत ५ लाख १८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे . या प्रकरणी ट्रक चालक संतोष मारुती रासकर (वय ४० ) रा . आण्णापूर ता.शिरूर आणि मालक सुहास लक्ष्मण शिंदे  याचा विरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
 
या बाबत सविस्तर माहिती अशी कि , भीमानदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून दौंड ,काष्टी ,श्रीगोंदा , ते राजापूर शिरूर रोडमार्गे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एमएच १४ बीजे ०९३५ या ट्रकला बेलवंडी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी हंगेवाडी शिवारात नाइट पेट्रोलिंग करत असताना पकडून त्यावर कारवाई केली . यावेळी पोलिसांनी ट्रकसह ५ लाख १८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात ट्रक चालक संतोष संतोष मारुती रासकर व मालक सुहास लक्ष्मण शिंदे यांचावर गुन्हा दाखल केला आहे . तर मालक सुहास लक्ष्मण शिंदे फरार आहे .
 
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह बेलवंडी पोलिसांनी केली ,