मत खरेदी-विक्रीमुळे निवडणुकांमधून भ्रष्टाचाराची गंगोत्री सुरू – अ‍ॅड. कारभारी गवळी

देशात मत खरेदी-विक्रीमुळे निवडणुकांमधून भ्रष्टाचाराची गंगोत्री सुरू असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. निवडणुकीत पैश्यातून सत्ता व सत्तेतून पैसा निर्माण करणार्‍या उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी संघटनांनी जय शिवाजी.. जय डिच्चूकावा मोहीम सुरू केली असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूविरुद्ध गनिमी कावा आणि स्वराज्यातील फंदफितुरी अधिकार्‍याविरुद्ध डिच्चूकावा तंत्राचा वापर केला होता. स्वराज्याशी गद्दारी करणार्‍या फंदफितुरी यांचा महाराजांनी कडेलोट केला. त्याचबरोबर त्यांचे अधिकार काढून घेतले. त्यामुळे शिवाजी महाराजांचे शासन जगातील सर्वश्रेष्ठ असे शासन-प्रशासन मानले जाते. गेल्या 75 वर्षातील स्वातंत्र्योत्तर काळात या देशात गोरे इंग्रजांना हाकलून लावून, काळे इंग्रजांचे राज्य विस्तारित होत आहे. यामधील भ्रष्ट उमेदवार पैश्यातून सत्ता मिळवण्यासाठी मतदारांना हजार, पाचशे रुपये देऊन किंवा कोंबडी दारूची लाच दाखवून जोंधळ्याची शपथ देतात. जातीचा किंवा मत भ्रष्ट मतदारांचा वापर करून मागच्या दाराने सत्तेत येतात. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात धनदांडग्यांनी मतदारांना एक दिवसाची लालूच दाखवून पुढील पाच वर्षे मतदारांचे काही एक काम केले नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर सरकारी तिजोरी लुटण्यासाठी केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापासून प्रत्येक मतदाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करणार्‍या चारित्र्यसंपन्न उमेदवारालाच मतदान करायचे. पैसे देऊन भ्रष्ट मार्गाने पैसा कमविण्यासाठी सत्तेत येऊ पाहणार्‍या विरोधात महाजारांचा डिच्चूकावा तंत्र वापरण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. मागच्या दाराने सत्ता ताब्यात घेणार्‍या लोकांमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. त्यामुळे देशातील भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी उपोषण, मोर्चा, अर्ज विनंत्यांना कवडीची किंमत राहिलेली नाही. भ्रष्टाचाराची गंगोत्री म्हणजे मतदारांनी छोट्या लाभासाठी देश विकण्याचे काम करू नये. हे आंदोलन सत्याग्रही मार्गाने केले जाणार असून, देशाच्या कानाकोपर्‍यात घराघरात देशभरात जय शिवाजी… जय डिच्चूकावा तंत्राचा स्विकार करण्याची गरज आहे. अन्यथा इंग्रज देशातून जाऊनही स्वातंत्र्याची फळे सामान्य माणसाला यापुढे देखील मिळणार नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.देशात मत खरेदी-विक्रीमुळे निवडणुकांमधून भ्रष्टाचाराची गंगोत्री सुरू असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. निवडणुकीत पैश्यातून सत्ता व सत्तेतून पैसा निर्माण करणार्‍या उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी संघटनांनी जय शिवाजी.. जय डिच्चूकावा मोहीम सुरू केली असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूविरुद्ध गनिमी कावा आणि स्वराज्यातील फंदफितुरी अधिकार्‍याविरुद्ध डिच्चूकावा तंत्राचा वापर केला होता. स्वराज्याशी गद्दारी करणार्‍या फंदफितुरी यांचा महाराजांनी कडेलोट केला. त्याचबरोबर त्यांचे अधिकार काढून घेतले. त्यामुळे शिवाजी महाराजांचे शासन जगातील सर्वश्रेष्ठ असे शासन-प्रशासन मानले जाते. गेल्या 75 वर्षातील स्वातंत्र्योत्तर काळात या देशात गोरे इंग्रजांना हाकलून लावून, काळे इंग्रजांचे राज्य विस्तारित होत आहे. यामधील भ्रष्ट उमेदवार पैश्यातून सत्ता मिळवण्यासाठी मतदारांना हजार, पाचशे रुपये देऊन किंवा कोंबडी दारूची लाच दाखवून जोंधळ्याची शपथ देतात. जातीचा किंवा मत भ्रष्ट मतदारांचा वापर करून मागच्या दाराने सत्तेत येतात. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात धनदांडग्यांनी मतदारांना एक दिवसाची लालूच दाखवून पुढील पाच वर्षे मतदारांचे काही एक काम केले नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर सरकारी तिजोरी लुटण्यासाठी केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापासून प्रत्येक मतदाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करणार्‍या चारित्र्यसंपन्न उमेदवारालाच मतदान करायचे. पैसे देऊन भ्रष्ट मार्गाने पैसा कमविण्यासाठी सत्तेत येऊ पाहणार्‍या विरोधात महाजारांचा डिच्चूकावा तंत्र वापरण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. मागच्या दाराने सत्ता ताब्यात घेणार्‍या लोकांमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. त्यामुळे देशातील भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी उपोषण, मोर्चा, अर्ज विनंत्यांना कवडीची किंमत राहिलेली नाही. भ्रष्टाचाराची गंगोत्री म्हणजे मतदारांनी छोट्या लाभासाठी देश विकण्याचे काम करू नये. हे आंदोलन सत्याग्रही मार्गाने केले जाणार असून, देशाच्या कानाकोपर्‍यात घराघरात देशभरात जय शिवाजी… जय डिच्चूकावा तंत्राचा स्विकार करण्याची गरज आहे. अन्यथा इंग्रज देशातून जाऊनही स्वातंत्र्याची फळे सामान्य माणसाला यापुढे देखील मिळणार नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.