महाराजांचा नावाचा वापर फक्त स्वतःचा प्रसिध्दी साठीच
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकाच माळेचे मणी
अहमदनगर — छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमावरून नगर शहरात राजकारण सूरु झाले. खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळ्याचा श्रेय वाद पाहायला मिळत असताना अश्वारुढ नवीन पुतळ्याच्या नावाखाली गर्दी गोळा करून जनतेला हिंदूंना फसविण्याचा प्रकार हा नगर शहरांतील लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महापौरांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी दोन दिवसांपूर्वी नगर शहरात झाली होती. परंतू लोकार्पण सोहळा करतांना कुठेही शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्यात आलेला नसून जुन्याच पुतळ्याला रंगरंगोटी करण्यात आली व जनतेची स्वतःच्या स्वार्थासाठी दिशाभूल करण्याचा प्रकार हा नगर शहरांतील राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महापौरांनी केला आहे.