महिलेला गावठी कट्टा दाखवणारा गजाआड

अहमदनगर— नगर शहरातील केडगाव येथे गावठी कट्टा दाखवून महिलेला धमकी देणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश मिळाले आहे . नितीन साहेबराव शेलार (वय ५० रा. केडगाव, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शेलार कडून दुचाकी गाडीसह एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार , दि. ६ फेब्रुवारी रोजी फिर्यादी वंदना अशोक भिंगारदिवे या केडगाव येथे राहत्या घरी असताना आरोपी नितीन शेलार त्या ठिकाणी गेला होता.व फिर्यादी भिंगारदिवे यांच्या घरी जाऊन तुमच्या मुलाने माझ्या पुतणीला पळवून नेऊन लग्न केले आहे, त्यामुळे आमची बदनामी झाली आहे, असे म्हणत आरोपी शेलार याने गावठी कट्टा फिर्यादीला दाखवला. तसेच तुमचा मुलगा आणि सून कुठे आहे, असे म्हणत फिर्यादी वंदना भिंगारदिवे आणि त्यांचा मुलगा अक्षय भिंगारदिवे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणाची माहिती फिर्यादी वंदना भिंगारदिवे यांच्या मुलाने पोलिसांना दिली . माहिती समजताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे गुन्हे शोध पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शेलार याला ताब्यात घेतले. या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे तपास करत आहेत .

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल ,नगर शहराचे उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपत शिंदे , उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे,पोहेकॉ.सतिष भांड ,पोना. योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलीम शेख ,संतोष गोमसाळे, राजू शेख, पोकॉ. अभय कदम, दीपक रोहोकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, संदीप थोरात, राजेंद्र केकाण, राजेंद्र फसले यांनी ही कारवाई केली आहे.