मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त राबविले विविध सामाजिक उपक्रम

शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि.९ फेब्रुवारी) महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोज घुले, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव, बाबुशेठ टायरवाले, अनिल लोखंडे, संग्राम शेळके, योगेश गलांडे, महेश लोंढे, अभिषेक भोसले, अक्षय कातोरे, ओंकार शिंदे, गौरव शिंदे, काका शेळके, आनंदराव शेळके, अनिकेत कराळे, रणजीत परदेशी, प्रल्हाद जोशी, चंद्रकांत उजागरे, किरण उनवणे, पोपटराव पाथरे, शशांक महाले, राज कोंडके, दामोदर भालसिंग, बाबू काकडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरोग्य शिबिरातंर्गत जागृक पालक, सदृढ बालक या  अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये जन्मलेल्या बाळकापासून १८ वर्ष वयापर्यंतच्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी . जिल्ह्यात १६  लाख पेक्षा जास्त बालकांच्या तपासणीचा उद्दिष्ट होते. यासाठी जिल्ह्यात सहाशे टीम तयार करण्यात आले असून, ते  विविध भागात मुलांची आरोग्य तपासणी करणार आहे.

सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे यांच्या रुपाने महाराष्ट्राल लाभले असे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले. हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे असून, त्याच विचाराने समाजात कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, महाराष्ट्राला कार्यकर्तृत्व असलेला मुख्यमंत्री लाभला. गरिबांसाठी अनेक योजना मुख्यमंत्री शिंदे राबवित आहे. शेतकरी, गोरगरिबांना न्याय देण्याचे व सेवा करण्याचे काम राज्यात शिंदे सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.