रविवारी शहरात सामाजिक विषयांवर रंगणार शॉर्ट फिल्म फेस्टिवल

रविवारी शहरात सामाजिक विषयांवर शॉर्ट फिल्म फेस्टिवल रंगणार आहे. लघुपटाच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्‍न अधोरेखित करुन त्यांविषयी जनजागृती होण्यासाठी व नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हेल्पिंग हँण्डस युथ फाऊंडेशन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या संयुक्त विद्यमाने या फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांनी दिली.
रविवार दि. 30 जानेवारी रोजी हॉटेल यश ग्रँड येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ होणार आहे. शिक्षण, युवा व महिला सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या समस्या, दिव्यांगांचे प्रश्‍न, ग्रामीण विकास, आरोग्य जनजागृती व वाहतूक कोंडी आदी विषयांवर फिल्म फेस्टिवल रंगणार आहे. यामध्ये आलेल्या लघुपटाचे परीक्षण करुन उत्कृष्ट कलाकार, अभिनेता, अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन, व्हिडिओ एडीटर, संगीत याबद्दल पुरस्कार दिले जाणार आहेत.