राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे भिंगार शहर अध्यक्ष सिद्धार्थ आढाव त्यांच्या जीवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी.

अहमदनगर (प्रतिनिधी )- भिंगार  छावणी परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सामाजिक न्याय विभागाचे भिंगार शहर अध्यक्ष सिद्धार्थ आढाव यांनी अहमदनगर छावणी परिषद वाहन प्रवेश कर आकारण्यात येणाऱ्या सर्व नाक्यांवर नाक्याच्या एका नामधारी सुपरवायझर कडून बेकायदेशीररित्या लावण्यात आलेले बोर्ड काढण्याचे निवेदन दिलेले आहे.

त्यामुळे ज्या कंपनीकडे सदरील वाहन प्रवेश कर आकारण्याचा ठेका आहे त्या बालाजी इंटरप्राईजेस कंपनीचे मालक सौ वैशाली लॉरेन्स स्वामी व सुपरवायझर मतीन सय्यद यांच्याकडून तसेच सदरील ठेक्यात भागीदार असणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तीकडून माझ्या जीवितास धोका असल्याची चर्चा भिंगार शहरात ऐकल्याने माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे . त्या अनुषंगाने आज पासून ते भविष्यात कधीही माझा घातपात किंवा अपघात होऊन माझ्या जीवितास कुठल्याही प्रकारची हानी अथवा माझा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार वरील दोन्ही व्यक्ती सह ज्ञात अज्ञात व्यक्ती जबाबदार असतील याची दखल घेत पोलीस संरक्षण मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे भिंगार शहराध्यक्ष सिद्धार्थ आढाव समवेत सृजन भिंगारदिवे उपस्थित होते.