वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक – बालकाचा मृत्यू
वडिलांसोबत दोन लहान बालके दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकर चा धडकेत एका बालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाला आहे हि घटना संगमनेर – कोल्हेवाडी येथे घडली .
या प्रकरणी सोमवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ट्रॅक्टर चा माध्यमातून वाळू वाहतूक होत असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये आहे . मोहम्मद इब्राहिम शेख असे अपघातात मृत्यू झालेल्या अडीच वर्षाचा बालकाचे नाव असून अबुहुरेरा असे अपघातात जखमी झालेल्या बालकांचे नाव आहे . त्यांचे वडील इब्राहिम मुनीर शेख (संगमनेर – कोल्हेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक मंगेश मारुती शितोळे (वय २८ रा संगमनेर खुर्द )आणि शफिक एजाज शेख (लख्मीपुरा .संगमनेर ) या दोघां विरोधात गुन्हा दाखल केला या आहे . इब्राहिम शेख आपल्या मुलांना घेऊन शहरातील बाबा चौकात मुलांना दूध आणण्यासाठी चालले होते त्यावेळी कोल्हेवाडी रस्त्याने भरधाव आलेला एम एच १७ ऐ इ २७५६ या क्रमांकाचा ट्रॅक्टर ने दुचाकीला धडक दिली त्यात त्यांचा अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा गाम्भीर जखमी झाला आहे . अपघाता नंतर ट्रॅक्टर चालक तेथून पळून गेला . रहिवाश्यांच्या मदतीने सर्व जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले . परंतु डोक्याला जास्त मार लागल्याने मोहम्मद शेख चा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी घोषित केलं . अपघाताची माहिती मिळाल्यांनतर पोलीस अपघात स्थळी पोहोचले ,ट्रॅक्टर व ट्रॉली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे .