शिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली – संजय सपकाळ

भिंगार मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चौका-चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भिंगार वेस येथे भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी… जय शिवाजी.. च्या घोषणांनी गावातील परिसर दुमदुमला.
भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी युवक उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, नाथाजी राऊत, प्रा. कैलास मोहिते, सुभाष होडगे, दिलीप ठोकळ, बाळासाहेब राठोड, अर्जुन बेरड, सिध्दार्थ आढाव, अशोक पराते, सदाशीव मांढरे, योगेश करांडे, मनोहर दरवडे, दिपक बडदे, मतीन ठाकरे, दिपक लिपाने, अरुण चव्हाण, नवनाथ मोरे, सर्वेश सपकाळ, कैलास वागस्कर, प्रताप शिदे, संतोष धीवर, राजेंद्र कंडुस, अच्युत गाडे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. महाराजांच्या पुर्वजांचा इतिहास नगरच्या मातीशी जोडला गेलेला आहे. शिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्यांचे विचार व कार्य समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.