श्री बाणेश्‍वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय जांब कौडगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

विद्यार्थ्यांनी नेहमी ध्येयवादी असले पाहिजे. जिवनामध्ये यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्‍वास बळगा. स्वतः विश्‍वास ठेवा नक्कीच यश मिळेल, असा आशावाद आदर्श सरपंच प्रा. डॉ. राम बोडखे यांनी केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, श्री बाणेश्‍वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बुऱ्हाणनगर, एकता महाविद्यालय सावेडी, मा. आ. शिवाजीराव कर्डिले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जांब (कौडगाव) यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित जांब कौडगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये प्रा.डॉ. बोडखे बोलत होते. यावेळी छत्रपती फाउंडेशनचे सचिव प्रा. किरणकुमार पवार उपस्थित होते. दरम्यान, प्रा. डॉ. राम बोडखे व प्रा. किरणकुमार पवार यांच्या हस्ते मा. आ. शिवाजीराव कर्डिले महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तीन महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. बोडखे म्हणाले, विद्यार्थ्यांनी जिवनामध्ये यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे जीवन चरित्र वाचले पाहिजे. जिवनामध्ये स्वालंबी बनले पाहिजे. एनएसएस शिबिरामधून श्रमदान, स्वालंबी शिक्षण, समता, बंधुता अशा नीतीमूल्यांची रूजवात होते. यावेळी एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. जाधव, प्रा. सागर कोहक, प्रा. सागर पगारे, प्रा. एस. एन. भोईटे, प्रा. आर. ए. कांबळे, प्रा. कवळे, प्रा. दिवटे, प्रा. पठाण आदी उपस्थित होते.