संत निरंकारी मिशनमार्फत दि. 5 रोजी संपूर्ण भारतातील 15 पर्वतीय स्थळांवर विश्व पर्यावरण दिवसाचे आयोजन

  नगर – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता यांच्या पावन आशिर्वादाने वैश्विक प्रदुषण व ग्लोबल वार्मिंगच्या संकटापासून जगाला वाचविण्यासाठी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने संयुक्त राष्ट्राची थीम असलेल्या ‘बीट प्लॉस्टिक पोल्युशन’ या विषयाला अनुसरुन सोमवार दि. 5 जून 2023 रोजी सकाळी 8.30 ते 1.00 वा. दरम्यान विश्व पर्यावरण दिवसानिमित्त मेगा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, पन्हाळा आदि पर्वतीय स्थळांचा समावेश आहे, अशी माहिती मंडळाचे नगर झोनप्रमुख हरिष खुबचंदानी यांनी दिलीे. त्यांनी पुढे सांगितले की, पर्यावरणाचा संतुलनासाठी मंडळाच्या नगर शाखेतर्फे नुकतेच कापूरवाडी तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले.

     पर्यावरण संकटाचा सामना करतांना प्रदुषणाची समस्या सोडविण्यासाठी जेव्हा अवघे विश्व एक साथ एका मंचावर उभे राहिले असताना संत निरंकारी सेवा दलाचे हजारो स्वयंवेक आपल्या खाकी गणवेषामध्ये तर संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक निळे टी-शर्ट व टोपी घालून स्वच्छतेसाठी सेवारत राहतील. त्याबरोबर अन्य निरंकारी भक्तगण व संबंधित शहरातील नागरिक मिळून वृक्षारोपण व स्वच्छतेचे मेगा अभियान राबवतील. ज्यायोगे प्रकृतीला स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर बनविले जाऊ शकेल.

     निश्चितपणे वेळावेळी आयोजित केली जाणारी अशा प्रक़ारची अभियाने प्रकृतीचे संतुलन कायम ठेवण्यासाठी निश्चितच एक सार्थक पाऊल असून, त्यामध्ये संत निरंकारी मिशन आपली महत्वपूर्ण भुमिका निभावत आहे.