समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या १९ दिवसांतच खड्डे!

नागरिकांमध्ये संताप; एमएसआरडीसी वर टीका

💥
 समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या १९ दिवसांतच खड्डे! नागरिकांमध्ये संताप; एमएसआरडीसी वर टीका

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी शेवटचा टप्पा ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटीत झाला होता. या ७६ किमी मार्गासाठी तब्बल २,८०० कोटी रुपयांचा खर्च झाला. मात्र, उद्घाटन होऊन १९ दिवस होत नाही तोच शहापूरजवळील ओव्हरपासच्या पुलावर खड्डे पडल्याचे समोर आले आहे.

👉 समृद्धी महामार्गाचा एकूण खर्च – ७०१ किमी साठी ६१,००० कोटी रुपये
👉 फक्त शेवटचा टप्पा (आमने-इगतपुरी) – ७६ किमी, खर्च २,८०० कोटी रुपये
👉 फक्त १९ दिवसांत ११ अपघात, अनेक वाहने नादुरुस्त

🛑 नागरिकांनी आणि वाहनचालकांनी महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर टीका केली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे डांबरीकरण झालेल्या भागात खड्डे पडले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काँक्रीट स्ट्रक्चर सुरक्षित असून खड्डे तातडीने भरले आहेत.

💬 नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी हे काम केले असून अंडरपासवरील डांबरीकरण पावसामुळे खराब झाले आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

🚧 मुद्दा – इतक्या प्रचंड खर्चानंतर आणि एवढ्या कमी दिवसांतच महामार्गावर खड्डे पडणे दुर्दैवी आहे. नागरिकांनी कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले आहे