सांस्कृतिक क्षेत्रात नगरचे मोलाचे योगदान : माजी आ. जगताप

  कला, साहित्य, नाट्य, चित्रपटांसह एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात  अहमदनगचे मोलाचे योगदान असून चित्रपटासारख्या जनसामान्यांची नाळ जुळलेल्या माध्यमात नगरची माणसं  प्रभावी आणि दर्जेदार काम करत आहेत, याचा अभिमान असल्याची भावना आ.अरुणकाका  जगताप यांनी व्यक्त  केली.

रुपया ,घुमा आणि टर्री या मराठी चित्रपटाचे  लेखक-दिग्दर्शक तसेच नगर तालुक्यातील खडकी गावचे भूमिपुत्र महेश काळे यांचा नुकताच आ. जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य सचिनभाऊ  जगताप,विकी जगताप,दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक समीर दाणी ,सुहास तरंगे, पी.के.भांडवलकर आदि उपस्थित होते.

यावेळी सचिनभाऊ  जगताप म्हणाले की, अहमदनगर शहर आणि जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आहे. येथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना लाखो  पर्यटक भेटी देतात. चित्रपटाच्या शूटिंगसाठी योग्य असलेली अनेक स्थळ येथे असल्यामुळे आगामी काळात या स्थळांना  चित्रपट आणि जनसावंदाच्या माध्यमातून  पुढे आणण्याचा मानस आहे. नगरकरांच्या सहकार्याने नगरला फिल्मसिटी उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.