उद्या वाजणार शाळांची घंटा

शिक्षण विभाग सज्ज : पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश

अहमदनगर:  56 दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी शाळा उघडणार असून जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्ये पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे 1257 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश जिल्ह्यातील 1 लाख 857 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका तसेच कटक मंडळाच्या शाळांमध्ये सर्व मुली अनुसूचित जाती-जमातीतील मुले, तसेच दारिद्र रेषेखालील कुटुंबातील मुले यांना शासनाकडून मोफत गणवेश केला जातो. या गणेशाचे पैसे शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समिती यांना दिले असून या समित्या गणवेश खरेदी करणार आहेत.
जिल्हा परिषद तसेच अनुसूचित शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तके गणवेश मोफत मिळणार आहेत. मात्र खाजगी शाळातील मुलांच्या पालकांना शालेय साहित्य खरेदीसाठी मोठा खर्च येत आहे. या शालेय साहित्याचे दर वाढल्याने प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन ते चार हजारापर्यंत खर्च जात आहे. राज्यभरातील 21 एप्रिल पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. या सुट्ट्या संपून आता15 जून पासून शाळांची घंटा वाजणार आहे. त्या दृष्टीनेमुख्याध्यापक, शिक्षकांनी तयारी केली आहे. जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, तसेच खाजगी, अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिले ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप दरवर्षी करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील 4 लाख 53 हजार 89 विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. ही पुस्तके तालुकास्तरातील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून केंद्राप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पोहोचवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे.

दुसरा गणवेश शोधांतरीचा दरवर्षी शासनाकडून दोन गणवेशाचे पैसे देण्यात येतात त्यातून स्थानिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समित्या कापड खरेदी करून गणेश गणवेश घेतात मात्र यावर्षी एक राज्य एक गणवेशीय धरतीवर थेट राज्यशास्त्र गणवेश पुरवणार अशी घोषणा झाली. मात्र याप्रमाणे अंमलबजावणी झाली नाही. शासनाने पूर्वीप्रमाणेच एका गणवेशाचे पैसे शाळांना दिले. मात्र दुसऱ्या गणेशाचे काय याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. या शाळांना मिळणार पुस्तके शासकीय शाळा समाज कल्याण आदिवासी विकास सेंट्रल स्कूल नवोदय स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ तसेच शासन अनुदानित अंशतः अनुदानित अशा एकूण साडेचार हजाराहून अधिक शाळांमधील साडेचार लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.