सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने अनाथांचे आधावड हरपले -शिवाजी पालवे

एकवीस वडांचे झाड लाऊन सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली

अनाथांसाठी सेवा कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री स्व. सिंधूताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ सारोळा कासार (ता. नगर) येथे जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने एकवीस वडांचे झाड लाऊन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अनाथांची माय असलेल्या सिंधूताई यांना वृक्षरोपणाने आगळीवेगळी श्रध्दांजली देण्यात आली.
वृक्षरोपण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसरपंच जयप्रकाश पाटील, शिक्षकनेते तथा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन संजय धामणे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव संजय काळे, प्रा.शहाजहान तांबोळी, सतीश कडूस, सुनील हारदे, संदीप काळे, संजय जाधव, वृक्षमित्र रवी गोरे, धनंजय मोकासे, ऋषीकेश अडागळे, सुनील धामणे, ऋषितेज काळे, गोरख काळे, भाऊसाहेब धामणे, माजी सैनिक मेजर शिवाजी लिंभोरे, कॅप्टन सुभाष ठोकळ, ध्येय मल्टिस्टेटचे गायकवाड, ज्ञानदेव काळे, ऋतिक काळे, ऋषीतेज काळे, ज्ञानेश्‍वर धामणे, संजय जाधव, जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, सचिन दहिफळे, सहदेव घनवट, संतोष दिवटे, कचरू शिंदे, जालिंदर दरेकर, समाजसेवक नंदू पालवे आदी उपस्थित होते.
जयप्रकाश पाटील म्हणाले की, सिंधूताई सपकाळ यांनी अनाथांना सावळी देण्याचे कार्य केले. आपल्या छायेत अनेकांना वाढवले. त्यांच्या नावाने लावलेली झाडे त्यांच्या समाज कार्याची प्रेरणा देत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पालवे यांनी सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने अनाथांचे आधावड हरपले. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे असल्याचे सांगितले. सुनील हारदे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक फाऊंडेशनने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांनी वृक्षरोपण केले असून, सजीव सृष्टीचे सैनिक म्हणून ते योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. लावण्यात आलेल्या झाडांचे पालकत्व सुनील धामणे बेंद मळ्यातील युवकांनी स्विकारुन वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली. आभार सचिन कडूस यांनी मानले.