ज्योतिष अभ्यासक अजित रेखी यांना ज्योतिष भुषण पुरस्कार

शहरातील जुन्या पिढीतील ज्योतिष अभ्यासक अजित रेखी यांना राज्यस्तरीय ज्योतिष भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पटवर्धन चौकात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ. देवदत्त रानडे, प्रा.बी.एम. तुपे, सि.ए. राजेंद्र गुंदेचा, हरियालीचे सुरेश खामकर, अ‍ॅड. मंगेश दिवाणे, पटवर्धन चौक मित्रमंडाचे अध्यक्ष संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथे झालेल्या कार्यक्रमात अजित रेखी यांना आमदार निलेश लंके यांच्या हस्ते ज्योतिष भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शहरातील श्री स्वामी समर्थ मठात रेखी सेवा देत आहेत. रेखी हे जुन्या पिढीतील ज्योतिष अभ्यासक असून, त्यांच्या कुटुंबीयांना ज्योतिष शास्त्राचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांचे पुर्वजांची इतिहासात नोंद आहे. चौथ्या पिढीचे वंशज असलेले अजित रेखी गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष शास्त्रात आपले योगदान देत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात ते ज्योतिषी म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे उपाध्यक्ष म्हणून देखील कार्य केले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल रेखी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.