स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने एक्साईड कंपनीला कामगारांच्या वेतनवाढ कराराचा डिमांड ड्राफ्ट सुपुर्द

स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने एमआयडीसी येथील एक्साईड बॅटरी लि. कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढ कराराचा डिमांड ड्राफ्ट कंपनीच्या अधिकार्‍यांना देण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ तापकिरे, उपाध्यक्ष किरण दाभाडे, सचिव पै. सुनील कदम यांनी कंपनीचे सीओएम अरविंद कुलकर्णी, एचआर हेड संतोष डंबीर, प्रोडक्शन मॅनेजर संदीप मुनोत यांच्याकडे वेतनवाढ कराराचा डिमांड ड्राफ्ट सुपुर्द केला. यावेळी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ तापकिरे म्हणाले की, कामगारांच्या हिताच्या दृष्टीने व महागाईचा विचार करुन एक्साईड बॅटरी कंपनीशी चांगल्यात चांगला करार केला जाणार आहे. कामगारांना भरीव वेतनवाढ मिळण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. कामगारांना किमान महागाईच्या काळात चांगल्या पध्दतीने जगता यावे व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा या उद्देशाने संघटना पगारवाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तर आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनपाचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या सहकार्याने हा करार लवकरच संपन्न होणार असल्याचे स्पष्ट केले.
प्रास्ताविकात अशोक म्हस्के यांनी संघटनेची माहिती देऊन कामगार हितासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. उपाध्यक्ष किरण दाभाडे म्हणाले की, पगारवाढीचा हा करार खेळीमेळीच्या वातावरणात होणार आहे. कामगारांचा फायदा व्हावा या प्रमुख उद्देशाने नवीन करार केला जाणार आहे. कायमस्वरूपी व कॉन्ट्रॅक्ट कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. नवीन कामगार भरती घेऊन बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. कामगारांच्या न्याय मागण्यासाठी तसेच कॉन्ट्रॅक्टवरती असलेल्या कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील कदम कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे सर्व सुविधा व योग्य कामाचा मोबदला या करारातून देण्याचा साठी प्रयत्नशील आहे पगार वाढ भत्ता कॅन्टीन नव्याने वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सचिव पै. सुनील कदम यांनी कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे सर्व सुविधा व योग्य कामाचा मोबदला या करारातून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पगार वाढ, भत्ता, कॅन्टीनसाठी नव्याने वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कामगार प्रतिनिधी बाबासाहेब गायकवाड, किसन तरटे, अशोक म्हस्के, दिनेश वाघ, सुधाकर तामखेडे, गौतम भालेराव, गोरख काकडे, राजू दोरगे, संतोष वाघ, रमेश पोकळे, योगेश ढगे, आप्पा बोबले, भाऊ शिंदे, गेरंगे, धनंजय राऊत, अतुल काळे, सुनिल खांन्दे, शिवाजी कदम, नितीन ब्राह्मणे, योगेश वाले, सचिन कांडेकर, महादेव फलके, नितनवरे, सुशिल पवार, बनकर, गांगर्डे, मिश्रा, नंदू गिते, गव्हाणे, मुसळे, सय्यद, गायके, लाळगे, अजय पोटे, शरद काळे आदींसह कंपनीतील कामगार उपस्थित होते.