१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.
काक परिवार आणि कुबेर उद्योग समूहात करार.
ऋषिकेश राऊत
अहमदनगर प्रतिनिधी :-
नगरविषयी मला नेहमीच प्रेम जिव्हाळा असल्याने आणि नगरला आपण आपले माहेर समजतो त्यामुळे आपण कुबेर उद्योग समूहाला आपण सोबत घेत असल्याची माहिती काक परिवाराचे कुटुंब प्रमुख किशोर काकडे यांनी सांगितले. यावेळी ऍड संजय झवेरी काक परिवाराचे नगर जिल्हा प्रमुख गौरव राऊत, नगर जिल्हा नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष शांताराम राऊत, कुबेर उद्योग समूहाचे श्रीप्रसाद पतके, श्री विशाल पतके, श्री चरण पतके उपस्थित होते.