महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी चे अर्ज दाखल

 

ऋषिकेश राऊत

अहमदनगर प्रतिनिधी

 

मनपाच्या महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक दि.15 सप्टेंबर रोजी पीठासीन अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून आज शिवसेनेकडून महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी पुष्पाताई बोरुडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांना सूचक नगरसेविका सुवर्णा गेंनप्पा,नगरसेविका सुरेख कदम व अनुमोदन कमळ सप्रे,शांताबाई शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपसभापती पदासाठी मीनाताई चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर सूचक म्हणून नगरसेविका दीपालीताई बारस्कर व अनुमोदक म्हणून नगरसेविका शोभाताई बोरकर हे आहेत .

यावेळी नगरसेविका शीतलताई जगताप,महापौर रोहिनीताई शेंडगे,नगरसेविका दीपालीताई बारस्कार,नगरसेविका शोभाताई बोरकर,स्थायी समितीच्या सभापती अविनाश घुले,मनपा विरोधी पक्षनेता संपत राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते,जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे,मा.महापौर भगवान फुलसौंदर,मा.महापौर सुरेख कदम,मा.महापौर शीलाताई शिंदे, संभाजी कदम,नगरसेवक सचिम शिंदे,मा.उपमहापौर अनिल बोरुडे,नगरसेवक प्रकाश भागानगरे,नगरसेवक गणेश कवडे,नगरसेवक शाम नळकांडे,पवार मा.नगरसेवक संजय चोपडा,दगडू मामा पवार,नगरसेवक रामदास आंधळे,बाळासाहेब बारस्कर, दत्ता पाटील सप्रे,आशाताई निंबाळकर, स्मिता अष्टेकर,अरुणा गोयल, सुषमाताई पाडोळे आदी उपस्थित होते.