6 गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसांसह दोन सराईत आरोपींना अटक

अहमदनगर- अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 गावठी  कट्टे आणि 12 जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे…
ऋषीकेश घारे आणि समाधान सांगळे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 1 लाख 86 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोल्हार येथे  ऋषिकेश घारे हा गावठी कट्टे विक्रीच्या उद्देशाने घेऊन येत  आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन सराईत अरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये  गावठी कट्टे बाळगणार  यांचे प्रमाण अधिक असल्याचं समोर येत आहे याबाबत लवकरच योग्य ती कारवाई करणार असल्याचा अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सांगितलं.