सिक्स्टी नाईन व्हेरी फाईन बटालियनचा वर्धापनदिन

नगरच्या सैनिकांनी भूषविले यजमानपद

अहमदनगर : भारतीय लष्कराच्या सिक्स्टी नाईन व्हेरी फाईन तोपखाना बटालीयन चा ५९ वा वर्धापन  दिन नगरमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.  १९७१ च्या युद्धात पाकिस्तान विरुद्ध  मोठा पराक्रम गाजविणारी ही बटालियन सदैव चर्चेत असते. या बटालियनचा वर्धापन दिन दरवर्षी नवनवीन  ठिकाणी साजरा केला जातो . यावर्षी हा मान नगरच्या आजी माजी सैनिकांना मिळाला . यामुळे नगर जिल्ह्यातल्या या बटालियनच्या आजी माजी सैनिकांनी आणि अधिकारी परिवाराने या सोहळ्याचे यशस्वीपणे आयोजन केले आणि उपस्थितांची मने जिंकली . यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून सैनिक सहकुटुंब या कार्यक्रमासाठी आले होते.  १९७१   च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजविणाऱ्या सिक्स्टी नाईन व्हेरी फाईन  तोफखाना बटालियन आता ६० वर्षात पदार्पण करते आहे. या बटालियनचे अधिकारी आणि आजी माजी  सैनिक दरवर्षी हा वर्धापन दिन एकत्र येऊन साजरा करतात. यावर्षी याचे नियोजन नागरकरांकडे होते. त्यानुसार सारोळा बद्दी इथे गोदावरी लॉन च्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

Also see this and subscribe 

 

 

 

यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते फलकाचे  अनावरण करून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या . यावेळी माजी सैनिकांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांना रोमांचित केले.   १ फेब्रुवारी १९६३ साली जालिंदर मध्ये स्थापन झालेल्या या बटालियनने वेळोवेळी झालेल्या युद्धात मोठा पराक्रम गाजविला . याचा उल्लेख उपस्थित अधिकाऱ्यांनी आवर्जून आपल्या भाषणातून केला . कर्नल विवेक भटारा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सिक्सटी नाईन बटालियन चे हवालदार कुशल घुले यांनी यावेळी या कार्यक्रमाची सविस्तर  माहिती दिली. आणि उपस्थित सैनिकांचे आभार मानले. मिलिटरी ची दोस्ती फक्त रेल्वे स्टेशन पर्यंत नसून ती आयुष्यभरासाठी असते, असे सिक्सटी नाईन बटालियनच्या सुभेदार डी.आर रहाणे म्हणाले.  सिक्सटी नाईन बटालियनची कारकीर्द आणि बटालियन विषयी अधिक माहिती हवालदार  जगन्नाथ   जाधव यांनी दिली.

या बटालियन मधील वीर माता वीर पत्नी आणि वीर कन्यांचा गौरव करण्यात आला.  या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन आर्टिलरी कॅप्टन बन्सी डाके , बापू विटेकर , सुभेदार ज्ञानदेव राहणे ,  हवाल दार  जगन्नाथ   जाधव रोहिदास भोर , कुशल घुले, या समिती सदस्यांनी केलं होत .  या कार्यक्रमासाठी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन चे शिवाजी पालवे आवर्जून उपस्थित होते. तसेच   हवालदार संजय लोखंडे, हवालदार शरद पवार, हवालदार, शेख इरफान, हवालदार रणवीर धोंगडे, हवालदार, डी . टी काळे, नायक उंडे बाळू, नायक आर.टी शिंदे, नायक विजय बिगरे, नायब सुभेदार दादा डावखर, नायब सुभेदार अशोक घोडके, हवालदार विक्रम बेरड, हवालदार जगन्नाथ लगड  आदी उपस्थित होते.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.