अहामदनगर – शहरातील नवी पेठ परिसरातील श्रीराम मंदिरात शनिवारी (ता.३) रोजी सामुहिक तारक मंत्र जपाचे आयोजण करण्यात आले आहे. याप्रसंगी पुर्ण भक्ती भावाने हनुमान चालिसेचे पठण होणार असुन, हनुमान चालीसा पठणासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ द्रस्ट च्या वतीने हा सामुहिक जप आयोजित करण्यात आला असुन, श्रीराम मंदिरात महिन्यातील पहिल्या शनिवारी सामूहिक संगीतमय तारक मंत्र जप होणार आहे. अशी माहिती ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच शहरातील तमाम हिंदू बांधवांना या मंत्र जप सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.तसेच याप्रसंगी श्री हनुमान चालीसा पाठ देखील करण्यात येणार आहे. या नामस्मरण स्वरूपी अनुष्ठानात भाग घेऊन सर्व शहरवासीयांनी प्रभू श्रीराम चरणी आपली सेवा अर्पित करावी , असे आवाहन श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ, ट्रस्टचे अध्यक्ष प्रितमजी मु्थ्था व उपाध्यक्ष निखिलजी शेटीया यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवी पेठ श्रीराम मंदीरात सामुहिक तारक मंत्र जप.