सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र तर्फे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर

अहमदनगर : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांना मानाचा महात्मा फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. सावित्री शक्तीपीठाच्या प्रमुख अर्चना कावलकर यांच्या संस्थेने हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. याची घोषणा पुरस्कार समितीचे प्रमुख पुणे येथील दशरथ कुळधरण यांनी केली आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डागवाले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सामाजिक काम करताना नगरमध्ये किशोर डागवले यांनी सर्व धर्म समभाव जपला. सर्वांना बरोबर घेऊन समाज कार्यात ते आघाडीवर असलेले नेतृत्व आहे. त्यामुळेच आपण किशोर डागवाले यांना हा महात्मा फुले पुरस्कार देत असल्याचे दशरथ कुळधरण यांनी सांगितले.

राजकीय, सामाजिक, उद्योग, सास्कृतिक शेत्रात समाजभिमुख व्यक्तिमत्व म्हणून यांची ओळख आहे. आज ते सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष असून त्याच्या काळात संस्थेला जागा उपलब्ध करून त्यांनी दिली असून सर्वांना बरोबर घेऊन माळी समाजाचे कार्ये उतम करीत आहेत. मनपात २५ वर्षे नगरसेवक म्हणून तसेच स्थायी समिती सभापती, उपनगराध्यक्ष, गट नेता विरोधीपक्ष नेता अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहे. आज ते भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश पातळीवरील कार्य उपाध्यक्ष या नात्याने सक्षमपणे करत आहेत तसेच आपले शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने नगर शहरात विविध उपक्रम घेऊन समाज संघटन, प्रबोधनात्मक कार्ये करत आहेत. त्यामुळेच आपण त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचं कुळधरण यांनी म्हटलं आहे. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना किशोर डागवले म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळे मी हे यश मिळविले असून माळी समाज, ओबीसी समाज अथवा इतर समाजाशी आपले स्नेहाचे सबंध असून मला सर्वाचे सहकार्य लाभत आहे. आपल्या जीवनात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य आपण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपण तन मन धनाने काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.