आदर्श शिक्षिका पद्मा कुलकर्णी निवर्तल्या !
अहमदनगर : ज्येष्ठ आदर्श शिक्षिका श्रीमती पद्मा एकनाथ कुलकर्णी यांचे काल खाजगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे स्नेहालयचे पालक आणि उद्योजक मिलिंद, कोल्हापूर येथील डॉ. गिरीश, ॲड.रवींद्र ही मुले, सूना, नातवंडे, पतवांडे असा परीवार आहे. स्नेहालय मधील श्री. राजीव गुजर, संजय बंदिष्टी आणि इतर अनेकांवर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. खडतर परिस्थितीत त्यांनी सर्व कुटुंबाला भक्कम आधार, शिक्षणाची आणि सामाजिक जाणीव दिली. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी या संस्थेत ३५ वर्ष अध्यापन करीत असताना हजारो विद्यार्थ्यांना प्रेम आणि जिव्हाळ्याने ध्येयप्रेरित केले. स्नेहालय संस्थेच्या उभारणीतही त्यांनी सहकुटुंब अनमोल योगदान दिले. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी सामाजिक, उद्योग, शिक्षण, वैद्यकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मोठा जनसमुदाय अमरधाम मध्ये उपस्थित होता.