कॅटरिनाच्या सुंदर केसांचं गुपित काय?

मनोरंजन : कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी. कॅटरिना आणि तिच्या सासरच्या मंडळीमधील घट्ट नाते अनेकदा दिसून आले आहे. सासू आपल्या लाडक्या सुनेची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे कॅटरिना सुद्धा सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावाचा वारंवार उल्लेख करते. तिच्या सासूबाई तिच्यासाठी एक खास तेल बनवतात. याचा खुलासा करत ती म्हणते, ‘माझी सासूबाई माझ्यासाठी कांदा, आवळा, एव्होकाडो आणि त्यात आणखी दोन-तीन गोष्टी टाकून केसांना लावण्यासाठी तेल बनवतात. त्याशिवाय घरगुती उपाय देखील खूप चांगल्या प्रकारे करतात.’