महाकुंभ मेळाव्याची १८३ देशांना लागली उत्सुकता!
जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा प्रयागराज महाकुंभ याविषयी केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता आहे. महाकुंभच्या वेबसाइटला भेट दिलेल्या नेटकऱ्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. महाकुंभची वेबसाइट हाताळणाऱ्या तांत्रिक टीमच्या प्रतिनिधीनुसार, ४ जानेवारी २०२५ पर्यंत १८३ देशांतील ३३ लाखांहून अधिक लोकांनी महाकुंभच्या वेबसाइटला भेट दिली आहे आणि या विषयावर माहिती घेतली आहे. या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेसह सर्व खंडातील लोकांचा समावेश आहे. १८३ देशांतील ६,२०६ शहरांतील लोकांनी या वेबसाइटला भेट दिली. भारत, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जर्मनीतून लाखो लोक महाकुंभाच्या माहितीसाठी वेबसाइटला भेट देताहेत. ६ ऑक्टोबर रोजी ही वेबसाइट सुरू करण्यात आली होती.