इस्रो आज करणार स्पेस डॉकिंगचा प्रयोग!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आपला महत्त्वाकांक्षी स्पेस डॉकिंग प्रयोग गुरुवारी पार पाडणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम ७ जानेवारी रोजी होणार होता, मात्र तो गुरुवारी सकाळसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानामध्ये प्रभुत्व मिळवणारा भारत हा जगातील चौथा देश होईल. इस्रोने या मोहिमेअंतर्गत ३० डिसेंबर रोजी एसडीएक्स ०१ (चेझर) आणि एसडीएक्स ०२ (लक्ष्य) हे दोन उपग्रह प्रक्षेपित केले होते. या तंत्रज्ञानाची कामगिरी चंद्रावर अंतराळवीर पाठवणे, चंद्रावरून नमूने आणणे, भारतीय अंतराळ स्थानकाची निर्मिती आदी भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वाची आहे.