शहर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?

संगमनेर मध्ये चर्चेला उधाण: पोलीस अधीक्षकाच्या भूमिकेकडे लक्ष


🚨
शहर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?
संगमनेर मध्ये चर्चेला उधाण: पोलीस अधीक्षकाच्या भूमिकेकडे लक्ष

📌 संगमनेर, ता. 22
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारवाईवरून शहरात चर्चांना उधाण आले आहे.
➡️ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारघर यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट इशारा दिला होता:
“पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळल्यास संबंधित प्रभारी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.”

⚡ शुक्रवारी (ता. 20) मोठी कारवाई:
➡️ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने संगमनेर शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकले
➡️ दहा लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
➡️ उपस्थितांविरोधात गुन्हे दाखल

💥 महत्वाचे:
ही कारवाई स्थानिक पोलीस ठाण्याऐवजी विशेष पथकाने केल्याने स्थानिक पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
➡️ अनेकदा जुगार अड्डे, अवैध कत्तलखाने व इतर गैरकायद्याचे धंदे सुरू असल्याच्या तक्रारी होत्या
➡️ मात्र स्थानिक पोलीस याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप

🗣 आमदार अमोल खताळ यांची बैठक:
➡️ त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले
➡️ तरीही परिस्थितीत फारसा बदल दिसून आला नाही

👁 नागरिकांचे म्हणणे:
➡️ “शहर पोलीस दलाचा हलगर्जीपणा अधोरेखित होतोय.”

🔎 पोलीस अधीक्षक सोमनाथ खारघर यांची भूमिका:
➡️ पदभार स्वीकारताच त्यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले
➡️ आता केवळ गुन्हेगार नव्हे, तर पोलीस अधिकारीही रडारवर

 

❓ प्रश्न:
➡️ संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिस्तभंगाच्या कारवाईच्या फेऱ्यात येणार का?
➡️

अधिकृत कारवाई होणार का?

➡️ सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे