💫 शिर्डीत व्हीआयपी दर्शनाचे नवे नियम! सामान्य साईभक्तांना मिळणार दिलासा 🙏
शिर्डी, ता. 22: शिर्डी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने व्हीआयपी व महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ‘ब्रेक दर्शन’ची नवी व्यवस्था लागू केली आहे. येत्या रविवारपासून (22 जून) ही नवी पद्धत अंमलात येणार आहे. यामुळे सामान्य साईभक्तांच्या दर्शन रांगेत अडथळा येणार नाही आणि त्यांना सहज दर्शन घेता येईल, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
🌟 व्हीआयपी दर्शनाची वेळ:
✅ सकाळी : 9 ते 10
✅ दुपारी : 2.30 ते 3.30
✅ रात्री : 8 ते 8.30
या वेळीच शिफारस पत्र घेऊन आलेल्या व्हीआयपींना साई दर्शन घेता येणार आहे. मात्र, अति महत्त्वाच्या व्यक्तींना आणि ₹1 लाख किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्या भक्तांना यामध्ये सूट राहणार आहे आणि त्यांची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच राहील.
👑 ज्यांना मिळणार विशेष सवलत:
भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, प्रसिद्ध उद्योगपती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिने अभिनेते, शास्त्रज्ञ तसेच संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आणि ₹1 लाख किंवा त्याहून अधिक देणगीदार.
🚩 सामान्य भक्तांसाठी दिलासा:
या नव्या निर्णयामुळे दिवसभरात व्हीआयपी दर्शनामुळे होणारा त्रास टाळला जाणार आहे. सुरक्षा यंत्रणेवरचा ताण कमी होईल आणि दर्शन व्यवस्थाही अधिक सुचारू होईल.