संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश :- विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताव दिघावकर

भगवान राऊत (अहमदनगर) :- जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मोक्का अंतरंगात कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले असून जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे, उघडकीस न आलेले गुन्हे तसेच खून, दरोडे, वाळु तस्करी, अवैध गुटखा विक्री असे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष मोहीम राबविणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली.
येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. दिघावकर म्हणाले की, जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कलम ५५ चा वापर करून गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. व्यावसायिक गुन्हेगारांच्या टोळ्या, अवैध वाळु तस्करी या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत तडीपारीची कारवाई करण्याचे  आदेश देखील जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले असून, विशेष पथकांद्वारे ही कारवाई करण्यात येणार आहे.

शेतकरी, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार यांची फसवणूक, महिलांवरील अत्याचार या स्वरूपातील गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी ची मोहीम सक्षमपणे राबविणार

या गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास करण्यासाठी क्राईम क्लॉक व क्राईम टाईम टेबलचा वापर करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात द्राक्ष, डाळिंब व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पर राज्यातील व्यापाऱ्यांकडून बनावट चेक देऊन फसवणूक करण्याचे गुन्हे वाढले आहेत.  अशा गुन्ह्यांचा सखोलपणे तपास करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत आहे. जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्यांचा तपास योग्य दिशेने व वेळेवर व्हावा यासाठी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन व पोलीस बळ वाढविण्याचे प्रस्ताव प्रलंबित असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात घडणारे छोटे गुन्हे म्हणजे मोठ्या गंभीर गुन्ह्यांची जणनी आहे म्हणूनच आता छोट्या गुन्ह्यावर देखील पोलीस प्रशासन विशेष लक्ष देणार आहे. जिल्ह्यातील गावठी कट्ट्यांची छुप्या पध्दतीने होणारी विक्री रोखण्यासाठी अशा गुन्हेगारांवर देखील तडीपारी सारखे कारवाईचे आदेश दिले आहेत.
भरोसा सेल द्वारे महिलांवरील होणारे अन्याय, अत्याचाराचे गुन्हे, घरगुती हिंसा या सारख्या गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी दामिनी बिट मार्शल पथक सक्षमपणे काम करणार आहे, असे ते म्हणाले.
प्रारंभी अहमदनगर शहर प्रेस क्लब च्या वतीने प्रेस क्लब चे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी पुष्पगुच्छ देऊन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचा तर उपाध्यक्ष अरुण वाघमोडे व उमेर सय्यद यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा सत्कार केला.
https://youtu.be/W2DWudWBk5A