“जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी”
या ब्रीदवाक्याचा जगणं करणाऱ्या चंद्रकांत काळोखे ठरले 🎖️ 'छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२५' चे मानकरी!
🙏 “जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी” या ब्रीदवाक्य जगणं करणाऱ्या
चंद्रकांत काळोखे ठरले
🎖️ ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२५’ चे मानकरी!
💥 ३५ वर्षांच्या निःस्वार्थ सामाजिक सेवेचा राष्ट्रीय गौरव
सामाजिक समतेसाठी झगडणाऱ्या, मागासवर्गीयांसाठी आवाज उठवणाऱ्या, आणि अनेक युवकांना शिक्षण, खेळ व उद्योजकतेच्या प्रवासात दिशा देणाऱ्या चंद्रकांत शकुंतला भानुदास काळोखे यांचा गौरव आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे!
🕊️ समाजसेवेचा अडथळ्यांचा प्रवास:
– आरएसएस शाखेपासून सुरूवात
– अ. भा. विद्यार्थी परिषदेतून मागासवर्गीयांसाठी लढा
– शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी सोडली – फक्त समाजासाठी
– पोतराजकी बंद, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, ग्रामविकास, खेळ व उद्योजकता यांसारख्या अनेक समाजोपयोगी चळवळींचे नेतृत्व
🏆 खास उपलब्धी:
– स्टँड अप इंडिया योजनेतून अनुसूचित जातीतील महिलांना ४८ लाखांचे कर्ज
– ९ राष्ट्रीय खेळाडूंना घडवले, त्यातील ७ सरकारी सेवेत
– अपघातग्रस्तांवर अंतिमसंस्कार, मदतीचे कार्य
– संविधान जागर यात्रा २०२४ द्वारे जनजागृती
📍 पुरस्कार वितरण सोहळा:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, नागपूर
उपस्थित मान्यवर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे आणि इतर मान्यवर