हस्तांतरणात अडकली गरोदर महिलांची नोंदणी; काहींना मिळेना पैसे!
अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांचा आवाज दाबला जातोय का?

अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांचा आवाज दाबला जातोय का?
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना – गरोदर व स्तनदा मातांसाठी सुरु झालेली योजना आज नोंदणी अडचणींमुळे ठप्प!
२०१७ पासून सुरु असलेली योजना
लाभ: पाच हजार रुपयांची आर्थिक मदत
गरजूंना पोहोचायचं होतं सरकारचं पाठबळ… पण काय खरंच पोहोचलं?
मुख्य अडचण:
योजना आता महिला व बालकल्याण विभागाकडे हस्तांतरित
त्यामुळे अंगणवाडी सेविका की आशा सेविका – कोण नोंदणी करणार? यावरच संभ्रम!
महिनाभरांपासून अनेक महिलांची नोंदणीच थांबलेली आहे!
ऑगस्ट २०२३ पासून नवीन पोर्टल कार्यान्वित!
दुसऱ्या अपत्यासाठी – जर मुलगी असेल, तर लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ६ हजार रुपये
पहिल्या हप्त्याकरिता – नोंदणी १०० दिवसांत, एक तपासणी आवश्यक – ३ हजार रुपये
दुसरा हप्ता – लसीकरण पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये
योजनेचा आतापर्यंतचा जिल्हा अहवाल:
जुनं पोर्टल (2017-2023):
1.53 लाख लाभार्थी
66.26 कोटी रुपये DBT
नवीन पोर्टल (2024-2025):
52,160 लाभार्थी
22.24 कोटी रुपये DBT
वास्तविक समस्या:
391 जुने लाभार्थी अजूनही पैशाची वाट पाहतायत!
नवीन पोर्टलवरही 300 ते 400 महिलांना लाभ मिळालेला नाही!
ज्यांनी वर्षांपूर्वी नोंदणी केली त्यांना फक्त 2 हजार रुपयेच?
नोंदणी अधिकार आता अंगणवाडी सेविकांकडे दिला जाणार.
त्यांना लॉगिन मिळाल्यानंतरच प्रक्रिया सुरू होईल, असं प्रशासन म्हणतंय.