
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झाली अनोखी मोहिम
३० जून ते ९ जुलै २०२५
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पुढाकारातून नागरिकांना पोलीस दलाच्या कार्यावर अभिप्राय देण्यासाठी QR कोड व लिंकद्वारे सुविधा उपलब्ध!
मुख्य उद्दिष्ट:
पोलीस विभाग अधिक लोकाभिमुख होण्यासाठी नागरिकांचा थेट अभिप्राय
वाहतूक व्यवस्थापन, महिला सुरक्षा, अंमली पदार्थ विरोधी कारवाई, सायबर गुन्हेगारी या विभागांवर स्वतंत्र रेटिंग
कसा द्यायचा अभिप्राय?
QR कोड / लिंकवर क्लिक करा
तुमचं नाव वा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक नाही
मात्र, संबंधित पोलीस ठाण्याचे नाव लिहिणे अनिवार्य
५० शब्दांमध्ये तुमचा अभिप्राय मांडावा
प्रत्येक विभागासाठी १० पैकी गुण (Rating) द्यावेत
सर्व अभिप्राय गोपनीय ठेवण्यात येणार आहेत.
“चांगली सेवा आणि नागरिकांचा विश्वास मिळवणे हे आमचं ध्येय आहे”
— पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे