अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी जीवनावर चित्रपट

सरकारकडून १ कोटींची तरतूद!

🎬
अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी जीवनावर चित्रपट — सरकारकडून १ कोटींची तरतूद!
📍 अहिल्यानगर | प्रतिनिधी विशेष

🟢 पावसाळी अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय:
उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद जाहीर!

🛕 चोंडी विकास आराखड्याला मोठा चालना:
▪️ ६ मे २०२५ रोजी चोंडी येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत जाहीर केलेल्या ६८१ कोटींच्या चोंडी विकास आराखड्यातून
▪️ १५४ कोटींच्या कामांना स्थापत्य सल्लागार नेमणुकीद्वारे प्रत्यक्ष सुरुवात
▪️ सहकारी सूतगिरणी, चोंडीसाठी १३.२० कोटींचे भागभांडवल
▪️ दीर्घ मुदतीचे शासकीय कर्ज – १७.७० कोटी रुपये

🛣️ रस्ते सुधारणा आणि अन्य कामांसाठी भरीव निधी
▪️ कर्जत–कोरेगाव–चापडगाव–चोंडी–हळगाव–फक्राबाद–कुसडगाव रस्ते रुंदीकरणासाठी २०० कोटींचा प्रकल्प
▪️ २०२५-२६ साठी ६१.३८ कोटींची तरतूद प्रस्तावित
▪️ कर्जत येथील दिवाणी न्यायाधीश निवासासाठी २५ लाख निधी मंजूर

 

🙏 विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले:
“चोंडी विकास आराखड्याच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक, सूतगिरणी, रस्ते, आणि चित्रपट निर्माण हे प्रकल्प गावाला समृद्ध व ऐतिहासिक बनवतील.”