‘या’ गुलाबाने बदलले शेतकऱ्यांचे नशीब!

💰 १ लिटर तेलाची किंमत तब्बल ₹13 लाख!

🌹
‘या’ गुलाबाने बदलले शेतकऱ्यांचे नशीब!
💰 १ लिटर तेलाची किंमत तब्बल ₹13 लाख!

📍 दमास्क गुलाबाची (Damask Rose) शेती उत्तराखंडमधील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान! पारंपरिक शेतीपेक्षा अनेक पट अधिक उत्पन्न देणाऱ्या या गुलाबामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चित्रच बदलले आहे.

🧴 या गुलाबापासून मिळणाऱ्या इसेंशिअल ऑइलची किंमत प्रति लिटर ₹13 लाख, कारण यासाठी हजारो किलो फुलांची गरज भासते.
तेलाचा वापर अत्तर, परफ्यूम, स्किनकेअर, अरोमा थेरपी, आणि कॉस्मेटिकमध्ये होतो.

🌍 कॅनडा, दुबई, युरोप, ऑस्ट्रेलियात निर्यात, तर दिल्ली-मुंबईतील मोठ्या ब्रँड्स यावर अवलंबून!

🏞️ 2021 पासून सुरू झालेल्या प्रकल्पात 1600+ शेतकरी सहभागी
CAP (Center for Aromatic Plants) संस्थेच्या मार्गदर्शनाखाली लागवड क्षेत्र 100 हेक्टरवरून 150 हेक्टरपर्यंत वाढलं!

🗓️ फेब्रुवारी ते मे – फुलांची काढणीचा योग्य काळ
🚿 कमी पाणी लागणारी शेती
🌿 बांधावर, आडोशाला, किंवा मिश्र शेतीमध्येही शक्य
🏭 प्रोसेसिंग युनिटसाठी अनुदान, प्रशिक्षण, रोपे – सगळं CAP मार्फत उपलब्ध!

📜 इतिहास सांगतो, दमास्क गुलाबाची सुरुवात सीरियाच्या दमास्कस शहरात झाली.
मुगल काळात अत्तर व स्नानासाठी याचा वापर शाही घराण्यांमध्ये होत असे.
आजही आयुर्वेद आणि सुगंधी उद्योगात याला सर्वोच्च मान!

🔔 ही शेती म्हणजे हिरव्या सोन्याचं साम्राज्य!