लायन्स क्लबच्या नेतृत्वात तगडी तिकडी!

डॉ. आसनानी अध्यक्षपदी, मुनोत आणि कुलकर्णींची साथ

🚨
 लायन्स क्लबच्या नेतृत्वात तगडी तिकडी! डॉ. आसनानी अध्यक्षपदी, मुनोत आणि कुलकर्णींची साथ 💪

अहिल्यानगर | १ जुलै
समाजसेवेचा नवा अध्याय सुरू! लायन्स क्लब ऑफ अहमदनगरने २०२५-२६ या वर्षासाठी आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली असून, अध्यक्षपदी सुप्रसिद्ध फेशियल सर्जन डॉ. संजय आसनानी, सचिवपदी प्रशांत मुनोत आणि खजिनदारपदी दिलीप कुलकर्णी यांची वर्णी लागली आहे.

लायन्स क्लबने आजवर घराघरात लंगर सेवा, कन्यादान, महिला सक्षमीकरण, युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण, सायकल वाटप अशा असंख्य उपक्रमांमधून गरजूंना दिलासा दिला आहे. त्यामुळे नव्या कार्यकारिणीकडूनही सामाजिक बदलाची मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे.

🔹 डॉ. संजय आसनानी – २५ वर्षांपासून दंतचिकित्सेतील अनुभवी तज्ज्ञ, १६ वर्षांपासून लायन्समध्ये सक्रिय
🔹 प्रशांत मुनोत – उद्योजक, माजी रेल्वे सल्लागार सदस्य, १७ वर्षांपासून समाजसेवेतील एक हक्काचं नाव
🔹 दिलीप कुलकर्णी – ज्येष्ठ लायन्स सदस्य, इन्शुरन्स आणि वाहन सल्लागार

📢 “या वर्षी समाजोन्मुख उद्दिष्ट घेऊन विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत,” अशी माहिती अध्यक्ष डॉ. आसनानी यांनी दिली.

🟡 नव्या नेतृत्वाकडून आता समाजात ठोस बदलांची अपेक्षा!
📰 MetroNews.in साठी खास रिपोर्ट

 

#LionsClubAhmednagar #SocialLeadership #DrAsnani #PrashantMunot #DilipKulkarni #MetroNews #NewTeamAlert #AhmednagarUpdates