
प्रत्येक ग्रामपंचायतीत हवामान केंद्र बसणार!
कोपरगावातील अनेक गावं अजूनही पर्जन्यछायेतील (Low Rainfall Zone) असून तिथं फार कमी स्वयंचलित हवामान केंद्रं (Automatic Weather Stations) आहेत.
यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, पूर यासारख्या संकटातही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नव्हती!
पण आता आ. आशुतोष काळे यांच्या जोरदार पाठपुराव्यानंतर
राज्य सरकारनं निर्णय घेतलाय – जिथं हवामान केंद्र नाही, तिथं ग्रामपंचायती स्तरावर नवं केंद्र बसवणार!
यामुळे:
पिकविमा योजनांमध्ये अचूकता
अतिवृष्टी/दुष्काळात मदत मिळवणं सोपं
हवामान आधारित फळबाग योजनांचा फायदा
२०२५ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही घोषणा केली होती आणि आता अंमलबजावणी सुरु!
राज्य व केंद्र सरकार संयुक्तपणे काम करणार!
“Technology + Governance = Farmers First!”
कोपरगावच्या शेतीला आता हवामानाचं नेमकं भान!