RTE च्या 20 हजार जागा रिकाम्याच!
मोफत शिक्षणाची संधी... पण अजूनही हजारो जागा भरल्या गेल्या नाहीत!


मोफत शिक्षणाची संधी… पण अजूनही हजारो जागा भरल्या गेल्या नाहीत!
राज्यभरातील 8,863 खासगी इंग्रजी माध्यम शाळा RTE कोट्यासाठी पात्र
1,09,102 विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध
आतापर्यंत फक्त 88,309 प्रवेश झाले
अजूनही तब्बल 20,793 जागा रिक्त!
2025-26 साठी चौथी प्रतीक्षा यादी पूर्ण, पण आता प्रवेश प्रक्रिया थांबवली!
प्रतीक्षा याद्यांमधून झालेले प्रवेश:
पहिली यादी: 12,022
दुसरी: 4,797
तिसरी: 1,503
चौथी: 542
एकूण प्रतीक्षा यादीतून प्रवेश: 18,864
RTE कायद्यामुळे प्रत्येक मुलाला मिळतो शिक्षणाचा अधिकार – पण एवढ्या जागा रिकाम्या राहणं म्हणजे मोठी शोकांतिका!
मग प्रश्न असा — इतक्या जागा का भरल्या गेल्या नाहीत?
पालकांमध्ये माहितीचा अभाव?
तांत्रिक अडचणी?
शाळांचा सहभाग कमी?
शिक्षणासाठी लढा देणाऱ्या प्रत्येकासाठी ही बाब गंभीर विचारांची!
तुमचं मत काय?