ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये ख्रिसमस साजरा

सोशल डिस्टंसीगच्या सर्व नियमांचे पालन

  अहमदनगर: 
           
       अहमदनगरमधील चांद सुलताना हायस्कूल शेजारील ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये आज नाताळ म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव  आज मोठ्या उत्साहात  साजरा झालाय, यावेळी सर्व ख्रिस्त धर्मियांची भक्ती घेण्यात आलीय.  मंडळींचे आचार्य विद्यासागर भोसले यांनी बोधपर संदेश सर्व ख्रिस्तधर्मीयांना दिलाय.

          मानव जातीला स्वर्गीय मार्ग मिळावा यासाठी प्रभू  येशख्रिस्तांचा जन्म पृथ्वीवर जगाच्या उद्धारासाठी झाला आहे. व्यवस्थापक मंडळाने आज अत्यंत चोख व्यवस्था करत सोशल डिस्टंसीगच्या सर्व नियमांचे पालन सर्व बांधवांकडून होईल अशी व्यवस्था केली होती, मास्क,सॅनिटायझरचा वापर या सर्वांचा वापर करत हा कार्यक्रम पार पडलाय.  नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.  

            यावेळी संग्राम जगताप यांनी सर्व ख्रिश्चन बांधवाना शुभेच्छा देत समाजाला येणाऱ्या सर्व समस्या सोडविण्याचा शब्द दिलाय. उपस्थितांनी यावेळी आमदार जगताप यांचा सन्मान केलाय. आमदार जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.  याप्रसंगी ह्यूम मेमोरियल चर्चचे सेक्रटरी  जॉन्सन शेक्सपियर  यांनी  याबद्दल अधिक माहिती दिलीय.