डॉ. सुजय विखे पाटील यांचा दमदार शब्द – “कोणताही शेतकरी पाण्यावाचून राहणार नाही!”
राहाता तालुक्यातील एकरुखे येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते गोदावरी उजव्या कालव्याच्या नव्या अतिवाहक एस्केपचं भूमिपूजन थाटात पार पडलं!

“गोदावरी कालव्याचं काम पूर्ण झालं की, पुढील 25 वर्ष तुमच्या मुलांना पाण्यासाठी झगडावं लागणार नाही” – असा ठोस शब्द त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने दिला.
302 कोटींच्या मंजुरीनंतर उजव्या कालव्याच्या उपचार्यांचं काम लवकरच पूर्ण होणार.
चारी नंबर 1 ते 20 पर्यंतचा विकासही पुढील पाच वर्षांत पूर्ण.
राहाता नगरपंचायतीसाठी 65 कोटींची नवी नळपाणी योजना – प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहचवणार!
वीरभद्र रंगनाथ बाजारतळाचे काँक्रिटीकरण – बाजारात मिळणार आधुनिक सुविधा!
“सत्तर हजार मताधिक्य मिळवणं हे तुमच्या विश्वासाचं फळ आहे, आणि कामातूनच मत मिळतात,” असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं.
“निळवंडेचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतं हे आम्ही करून दाखवलं – जे स्वप्नातही कोणी विचारलं नव्हतं!”