
जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू – २७ जुलैपर्यंत अलर्ट मोड!
अहिल्यानगर, 15 जुलै –
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्त!
अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे.
२७ जुलै २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत आदेश लागू राहणार!
कोणाला लागू?
सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवणं बेकायदेशीर
शस्त्र बाळगणं किंवा प्रदर्शित करणं बंद
नियम तोडल्यास थेट कायदेशीर कारवाई!
कोणाला सूट?
धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका, लग्नसमारंभ, प्रेतयात्रा
पोलिस व शासकीय कर्मचारी
आधीच अधिकृत परवानगी घेतलेले कार्यक्रम
लोकहो, खबरदारी घ्या – नियम मोडाल तर शिक्षा टाळू शकणार नाही!