महायुतीत महामंडळ वाटपावरून रस्सीखेच! ‘म्हाडा-सिडको’वर अद्याप तिढा कायम!
महामंडळ वाटपावरून जोरदार राजकीय ताण

महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात महामंडळ वाटपावरून जोरदार राजकीय ताण निर्माण झालाय. राज्यातील एकूण 170 महामंडळे आणि प्राधिकरणांपैकी जवळपास 60% वाटपावर प्राथमिक सहमती झाली असली, तरी ‘म्हाडा’, ‘सिडको’सारख्या प्रभावी व “मलईदार” पदांवर अजूनही एकमत झालेलं नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून जलद नियुक्त्यांची मागणी होत आहे. तर भाजपमधील काही गट म्हणतात, “सर्व नियुक्त्या निवडणुकांनंतरच करा!” त्यामुळे तिढा अधिक वाढलाय.
अनेक आमदार व इच्छुक पदाधिकारी नाराज आहेत. त्यांचा दावा – “आम्ही पक्षासाठी जीव तोडून मेहनत घेतली, तरीही पद मिळालं नाही.”
आता या सगळ्या तणावावर अंतिम तोडगा काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर आहे.
लवकरच निर्णय होणार असून महामंडळाच्या खुर्च्यांवर कोण बसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे!
#महायुती #महामंडळवाटप #म्हाडा #सिडको #राजकारण2025 #MetroPortal #PoliticalBuzz