पिंपळगाव तुर्कमध्ये बिबट्यांची एन्ट्री! दोन जेरबंद, एक पळून – ग्रामस्थांत भीती आणि सुटकेचा निःश्वास

पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे नागरिक हैराण होते. शेळ्या, कोंबड्या, कुत्र्यांवर हल्ले सुरूच होते. अखेर ग्रामस्थांच्या सततच्या मागणीनंतर वनविभागाने पिंजरा लावला आणि बुधवारच्या पहाटे दोन बिबटे जेरबंद झाले!

🐆

🚨 एक मादी (वय ३-४ वर्षे) आणि तिचं एक पिल्लू (वय १ वर्ष) पिंजऱ्यात अडकले. मात्र एक पिल्लू अजूनही सुटं फिरत असल्याने भीतीचं वातावरण कायम आहे.

👀 स्वप्निल वाळुंज आणि आकाश वाळुंज यांनी बिबट्यांना सर्वप्रथम पाहिलं. तत्काळ वनविभागाशी संपर्क करण्यात आला आणि बिबटे शिफ्ट करून पारनेरला रवाना करण्यात आले.

💪 या सर्च ऑपरेशनमध्ये ग्रामपंचायत, वनरक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मंडळींचा मोलाचा सहभाग होता.
👉 सरपंच सुलोचनाताई शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल रहाणे, निलेश बडे, भीमराव दवणे, दिगंबर विरोळे, किशोर गुंजाळ आदींनी ही कारवाई यशस्वी केली.

📲 व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सरपंचांनी परिसरात सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
🚧 अजूनही काही बिबटे परिसरात असण्याची शक्यता असून पुन्हा पिंजरा लावण्यात आलेला आहे.

👥 यावेळी ग्रामपंचायत सदस्य अक्षय वाळुंज, माजी चेअरमन विजय गवळी, संचालक संजय वाळुंज, धोंडीबा वाळुंज आदींची उपस्थिती होती.

🌿 “बिबट्यांचा बंदोबस्त झाला खरी, पण अजून धोका टळलेला नाही!” – स्थानिक नागरिक