वासरांच्या तस्करीला विरोध केला… आणि गोठ्यालाच लागली आग! निघोजमध्ये खळबळजनक घटना!
निघोज (पारनेर तालुका) – वासरांची तस्करी थांबवण्यासाठी आवाज उठवल्याचा राग आला आणि गाडामालक नीलेश भगवान भुकन यांच्या गोठ्याला २ जुलैच्या रात्री परप्रांतीय टोळक्याने पेटवून दिलं!

निघोज (पारनेर तालुका) – वासरांची तस्करी थांबवण्यासाठी आवाज उठवल्याचा राग आला आणि गाडामालक नीलेश भगवान भुकन यांच्या गोठ्याला २ जुलैच्या रात्री परप्रांतीय टोळक्याने पेटवून दिलं!
या घटनेनंतर गावात संतप्त वातावरण निर्माण झालं असून गुन्हेगारांना अटक करा, प्राण्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी निघोज ग्रामसभा भरवण्यात आली.
ग्रामसभेत जोरदार मागण्या:
आरोपींना तातडीने अटक
सखोल चौकशी
परप्रांतीयांचे अतिक्रमण हटवा
मतदार यादीतून नावे कमी करा!
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे होते.
घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मूक प्राण्यांसाठी लढा आता गावपातळीवर उभा राहिला आहे.
या ग्रामसभेत माजी सुधामती कांता लंके, सभापती खंडुजी भुकन, सचिन वराळ, सुभाष बबुशा वरखडे, अनिल शेटे, पो. लंके, मंगेश ढवळे, देवराम लामखडे, गोकुळ शिंदे आदींनी आपली मतं ठामपणे मांडली.
गुन्हेगार अजूनही मोकाट?
स्थानिक नागरिक आता प्रश्न विचारतायत – “वासरांची तस्करी करणारे मोकाट, आणि आवाज उठवणाऱ्यांवर सूड?”
“प्राण्यांसाठी आवाज उठवलं म्हणून आग लावणं ही फक्त गुन्हा नाही, ही मानसिकता धोकादायक आहे!” – ग्रामस्थ