वासरांच्या तस्करीला विरोध केला… आणि गोठ्यालाच लागली आग! निघोजमध्ये खळबळजनक घटना!

 निघोज (पारनेर तालुका) – वासरांची तस्करी थांबवण्यासाठी आवाज उठवल्याचा राग आला आणि गाडामालक नीलेश भगवान भुकन यांच्या गोठ्याला २ जुलैच्या रात्री परप्रांतीय टोळक्याने पेटवून दिलं!

🔥
 वासरांच्या तस्करीला विरोध केला… आणि गोठ्यालाच लागली आग! निघोजमध्ये खळबळजनक घटना!

📍 निघोज (पारनेर तालुका) – वासरांची तस्करी थांबवण्यासाठी आवाज उठवल्याचा राग आला आणि गाडामालक नीलेश भगवान भुकन यांच्या गोठ्याला २ जुलैच्या रात्री परप्रांतीय टोळक्याने पेटवून दिलं!

🪓 या घटनेनंतर गावात संतप्त वातावरण निर्माण झालं असून गुन्हेगारांना अटक करा, प्राण्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी निघोज ग्रामसभा भरवण्यात आली.

👥 ग्रामसभेत जोरदार मागण्या:
▪️ आरोपींना तातडीने अटक
▪️ सखोल चौकशी
▪️ परप्रांतीयांचे अतिक्रमण हटवा
▪️ मतदार यादीतून नावे कमी करा!

🗣️ ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे होते.
घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मूक प्राण्यांसाठी लढा आता गावपातळीवर उभा राहिला आहे.

📢 या ग्रामसभेत माजी सुधामती कांता लंके, सभापती खंडुजी भुकनसचिन वराळसुभाष बबुशा वरखडेअनिल शेटेपो. लंकेमंगेश ढवळेदेवराम लामखडेगोकुळ शिंदे आदींनी आपली मतं ठामपणे मांडली.

🚔 गुन्हेगार अजूनही मोकाट?
स्थानिक नागरिक आता प्रश्न विचारतायत – “वासरांची तस्करी करणारे मोकाट, आणि आवाज उठवणाऱ्यांवर सूड?”


 

✊ “प्राण्यांसाठी आवाज उठवलं म्हणून आग लावणं ही फक्त गुन्हा नाही, ही मानसिकता धोकादायक आहे!” – ग्रामस्थ