Breaking: शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्ब धमकी! ई-मेलवरून खळबळ
देशातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत असलेल्या साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी

शिर्डी – देशातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत असलेल्या साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने खळबळ उडाली आहे!
‘[email protected]’
या मेलनंतर तातडीनं शिर्डी ट्रस्टनं पोलीसांत तक्रार दाखल केली असून, संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सध्या बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड आणि इंटेलिजन्स युनिट एक्शनमध्ये आहे.
हेच पहिल्यांदा नाही!
मे महिन्यातसुद्धा अशाच प्रकारची धमकी एका “ajit jokamulla” नावाच्या ईमेलवरून आली होती. त्यावेळी मंदिराला पाईप बॉम्बने उडवण्याचा इशारा देण्यात आला होता.
देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक!
अंदाजे संपत्ती – ₹2000 कोटी
बँक बॅलन्स – ₹1800 कोटी
380 किलो सोने, 34,400 किलो चांदी
परदेशी चलनही भरपूर
काही दिवसांपूर्वीच एका अनाम भक्तानं 65 लाखांचे दागिने मंदिरात दान केले होते! सोन्याचा मुकुट, चांदीचा हार, आणि सोन्याची फुलं – भक्तांची श्रद्धा प्रचंड!
पोलिस आणि प्रशासन सतर्क!
तपास सुरू असून, श्रद्धाळूंना घाबरून न जाता सहकार्य करण्याचं आवाहन केलं गेलं आहे. दर्शनासाठी येणाऱ्यांची कडक तपासणी केली जातेय.
तुम्ही साईभक्त असाल तर ही अपडेट शेअर करा!