अहिल्यानगरच्या सुप्रसिद्ध महिला डॉक्टरचा अमेरिकेत दुर्दैवी मृत्यू…
ओव्हरलँड पार्क, कॅन्सस (USA) – राहुरीतील प्रसिद्ध दंतचिकित्सक आणि सेवाभावी डॉक्टर डॉ. अनुपमा वैद्य-चांदोरकर यांचा 21 जुलै 2025 रोजी अमेरिका येथे पावसामुळे आलेल्या पूरात बुडून मृत्यू झाला. त्या 62 वर्षांच्या होत्या.

ओव्हरलँड पार्क, कॅन्सस (USA) – राहुरीतील प्रसिद्ध दंतचिकित्सक आणि सेवाभावी डॉक्टर डॉ. अनुपमा वैद्य-चांदोरकर यांचा 21 जुलै 2025 रोजी अमेरिका येथे पावसामुळे आलेल्या पूरात बुडून मृत्यू झाला. त्या 62 वर्षांच्या होत्या.
नेहमीप्रमाणे सकाळी चालायला बाहेर गेलेल्या अनुपमा ताई अचानक आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे ओव्हरलँड पार्कमधील नाल्यात अडकल्या आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेत घरी न आल्याने त्यांच्या मुलीने पोलिसांना माहिती दिली आणि शोध मोहिमेदरम्यान ही घटना उघड झाली. ही माहिती ओव्हरलँड पार्क पोलिस विभागाचे प्रवक्ते जॉन लेसी यांनी दिली.
एक सेवाभावी जीवन…
अहिल्यानगरातील शिक्षक दांपत्य गणेश आणि सविता चांदोरकर यांच्या कन्या अनुपमा यांनी मुंबईतून दंतवैद्य पदवी घेतली आणि राहुरीमध्ये पती डॉ. अनिरुद्ध वैद्य यांच्यासोबत हजारो गरीब रुग्णांची सेवा केली. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मुंबईतील करिअर सोडून त्यांनी ग्रामीण भागात आपले आयुष्य समर्पित केले.
2003 मध्ये त्यांना अपघात झाला होता, पण जयप्रकाश संचेती यांच्या मदतीने अनर्थ टळला होता. आज त्यांच्या निधनानंतर संचेती यांनी ती आठवण शेअर करत डोळे पाणावले.
त्यांच्या पश्चात दोन मुली – डॉ. अदिती व प्रीती, जावई – धनंजय व सौमित्र, नातवंडे – आयुष, मायरा व ध्रुव, तसेच भारत-अमेरिकेतील अनेक आप्तस्वकीय आणि मित्रमंडळी असा मोठा परिवार आहे.
“गरीबांचं हसतं वळण… सेवा हीच पूजा मानणाऱ्या अनुपमा ताई यांचं असं अचानक जाणं हे समस्त नगरकरांसाठी मोठं दुःख आहे!”