ही दोस्ती तुटायची न्हाय! व्हॉट्सॲप ग्रुपवरून वर्गमित्राने वाचवला वर्गमित्राचा जीव
कुटुंबीय चिंतेत, हातात पैसे नाहीत... पण मग रंगतो तो मित्रत्वाचा खरा रंग!
ही दोस्ती तुटायची न्हाय! 

अहिल्यानगर / सारोळा कासार – शाळेत १लीपासून १०वीपर्यंत एकत्र शिकलेले जुने मित्र, आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत… पण वर्गातला एक मित्र बाळासाहेब रुद्राक्षे आर्थिक अडचणीत. केडगावमध्ये छोटा व्यवसाय करून घर चालवणाऱ्या बाळासाहेबला अचानक हृदयविकाराचा झटका!
डॉक्टर म्हणाले – शस्रक्रीया हवी… खर्च ३ ते ३.५ लाख!
कुटुंबीय चिंतेत, हातात पैसे नाहीत… पण मग रंगतो तो मित्रत्वाचा खरा रंग! १९९३-९४ च्या बॅचचा व्हॉट्सॲप ग्रुप वाजतो – “ही दोस्ती तुटायची न्हाय!” – आणि सुरू होतो मदतीचा ओघ!
सव्वा लाखांची मदत अगदी काही तासांत जमा! अजून मदतीची गरज आहेच, पण ही सुरुवातच भारी! कोणी पैसे पाठवले, कोणी हॉस्पिटलशी बोलले, कोणी डॉक्टरांचा सल्ला घेतला… म्हणजे मित्र म्हणजे फक्त हसणं-खिदळणं नाही, गरज पडली की देवदूतच! 
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या या बॅचने खरंच “मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा” ही ओळ जिवंत केलीय! प्रा. अनंत राऊतांची कविता आठवलीच पाहिजे!
मित्रांनो, अजून थोडी मदत हवी आहे… तुम्हीही या चांगल्या कार्यात सहभागी व्हा. कारण –
“ही दोस्ती तुटायची न्हाय!” 